आयोजन समिती

आयोजन समिती

समितीमधील सहभाग हा स्वयंस्फुर्तीने असल्यामुळे सहभाग व सहकार्यात सातत्य आवश्यक. गतवर्षात सुमारे दर दोन आठवड्यात एक अशा सातत्याने स्नेहबंधचे कार्यक्रम झाले. अशा सातत्यासाठी नियमीत बैठक घेणे आवश्यक आहे. चर्चेअंती दर महिन्याच्या पहिल्या शनीवारी संध्याकाळी सात वाजता बैठक घेण्यात यावी असे सर्वसंमतीने ठरले. आयोजन समिती सदस्यांची बैठकीस उपस्थिती अनिवार्य असेल.

आयोजन समिती सदस्यत्वासाठी अटी 

1. समिती सभासद इतर कोणत्याही स्थानिक सामाजीक संस्थेच्या समिती/ कार्यकारिणीचा सदस्य नसावा.

2. समितीमधे स्रिया व पुरुष दोघांचाही सहभाग असावा परंतु पती-पत्नी दोघेही समिती सदस्य असु नयेत.

3. वर्षातील कोणत्याही तीन बैठकींना अनुपस्थित राहिल्यास सदस्यत्व गोठवण्यात येईल.

4. स्नेहबंधच्या उपसमुहांच्या समन्वय समितीमधील मुख्य समन्वयक हा आयोजन समिती सदस्य असणे आवश्यक.

Contact Usआमच्याशी संपर्क साधा

Email Address:

snehbandhsohar@gmail.com