माझं ग्रंथालय

सोहार मधल्या मराठी भाषिक वाङ्मय रसिकांसाठी उत्तमोत्तम, दर्जेदार आणि नवनवीन पुस्तके कायमस्वरूपी उपलब्ध व्हावीत तसेच मुलांना पाठ्यक्रम-बाह्य वाचनाची गोडी लागावी या हेतूने स्नेहबंध ग्रंथालय सुरु करण्याचा विचार झाला. पारंपरिक वाचनालयातील पुस्तके एकदा वाचून झाली कि बहुदा ती पडून राहतात. यावर नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने ‘ग्रंथतुमच्यादारी’ हा सुंदर आणि व्यवहार्य पर्याय उपलब्ध केला आहे. २००९ पासून भारतभर तसेच भारता बाहेरही हा प्रकल्प यशस्विपणे राबवला जात आहे.

‘स्नेहबंध ग्रंथालय’ हि संकल्पना व त्याला ग्रंथ तुमच्या दारी अंतर्गत ‘माझं ग्रंथालय’ ची जोड देऊन, ‘स्नेहबंध: माझं ग्रंथालय’ उपक्रमाची सोहार मध्ये मराठी राज भाषादिनी, कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी, २७ फेब्रुवारी २०१८ रोजी सुरुवात झाली.

ओमान मधले हे पहिले मराठी वाचनालय/ ग्रंथालय.

ग्रंथालयात मोठ्यांसाठी विभाग तसेच बालविभाग असून मराठी तसेच इंग्रजी पुस्तके उपलब्ध आहेत.

 

सभासदत्वासाठी नियमावली:                          

    सभासदत्वासाठी भाषा/ राष्ट्रीयत्वाचे कोणतेही बंधन नाही.                      

 सभासद होताना, कुटुंब प्रमुखाच्या ओमान रहिवासी ओळख पत्राची साक्षांकित प्रत + अनामत रकमेपोटी पाच ओमानी रियाल + वार्षिक सभासद शुल्कापोटी दोन ओमानी रियाल जमा करावे.                  

    सभासदत्व दरवर्षी २७ फेब्रु पासून एक वर्षाकरिता दिले जाईल.            

   कोणतीही दोन पुस्तके एका वेळेस एका आठवड्यासाठी वाचण्या करता नेता येतील. त्यानंतर पुस्तकाची मुदत एक आठवड्यानेच वाढवून मिळेल. त्यासाठी ग्रंथालयात येऊन तशी नोंद करणे आवश्यक आहे.             

    कोणतेही पुस्तक दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधी साठी नेता येणार नाही. सोळाव्या दिवसापासून प्रतिदिन दोनशे बैजा दंड आकारण्यात येईल.                       

    पुस्तकांची देवाणघेवाण केवळ ग्रंथालयात येऊनच करावी. परस्पर करू नये.          

    पुस्तक गहाळ झाल्यास/ खराब झाल्यास पुस्तकाची किंमत व दंड रक्कम भरपाई म्हणून जमा करावी अन्यथा सभासदत्व रद्द समजले जाईल व अनामत रक्कम जप्त केली जाईल.

 

स्थळ:

मुल्तका अल कुर्रा बुकशॉप,

मवासलात ऑफिस शेजारी

 

संपर्क:

श्री.अब्दुल अझीझ (92072820)

Contact Usआमच्याशी संपर्क साधा

Email Address:

snehbandhsohar@gmail.com