सुगरण

जगभर जिथेजिथे मराठी माणुस पोहोचला आहे तिथेतिथे त्याला जेवणाच्या बाबतीत तडजोड करावी लागते. शाकाहारी असेल तर विषयच संपला. स्वावलंबी व्हावंच लागतं.सोहारमधेही दक्षिण भारतीय, गुजराथी आणी उत्तर भारतीय हेच प्रकार खावयास मिळतात आणी आपण त्यावरच समाधान मानतो.

या पार्श्वभूमीवर स्नेहबंध: सुगरण द्वारे आपण मराठी खाद्यसंस्कृती जपण्याचा आणि रुजवण्याचा स्नेहबंधचाहाछोटासाप्रयत्न करुयात.

१. मराठी तसेच नवनवीन पोषक आणि रूचकर पाककृतींची देवाणघवाण.

२. पाककृतींची प्रात्यक्षिके तसेच कार्यशाळांचे आयोजन.

३. आजारपण तसेच इतर अडचणींमुळे निर्माण होणार्‍या घरगुती जेवणाच्या समस्येचे समाधान.

४. अमराठी मित्रमंडळींची मराठी खाद्यपदार्थांशी तोंडओळख‘.

हे सगळे करताना व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता, रास्त दर आकारणी करुन सेवा पुरवणे अपेक्षित असते. त्यासाठीच सोहारमधल्या खवैय्यांचा आणी स्वयंपाक/ केटरिंगमधे रुची असणार्‍या स्नेहिंचा स्नेहबंध: सुगरणहा समूह फेब्रुवारी २०१८ मध्ये अस्तित्वात आला.

२४ नोव्हेंबर २०१७ रोजी मराठमोळ्या रुचकर पदार्थांचा गावरान वातावरणात आनंद घेण्यासाठी सौ. वृषाली पवार व सौ मंगल कोलते यांच्या पुढाकाराने गावरान मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते ज्यात सुमारे सव्वाशे उपस्थितांनी वांगं-बटाटा रस्सा, पिठलं , कोंबडी रस्सा, भाकरी अशा अस्सल गावरान मेजवानीचा आस्वाद घेतला. 

आजवर सुगरण समूहामार्फतस्नेहबंधच्या कार्यक्रमांसाठी वेळोवेळी खाद्य व्यवस्था करण्यात आली तसेच, दीपावलीचा फराळ, आणि पुन्हा ३० नोव्हेंबर २०१८ रोजी गावरान मेळ्याचे आयोजन करण्यात आले.

 या समूहाच्या उपक्रमांचा समन्वय सध्या श्री. लालचंद बोऱ्हाडे साधत आहेत. 

Contact Usआमच्याशी संपर्क साधा

Email Address:

snehbandhsohar@gmail.com