थोडे स्नेहबंध विषयी

२४/सप्टेंबर/२०१७

कोजागिरी पौर्णिमेच्या खाजगी व छोटेखानी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वाटस् अॅप समुहसुरु करण्यात आला. मित्र, मित्रांचे मित्र असे करत ४-५ कुटुंबांसाठीच्या प्रस्तावित कार्यक्रमासाठी ३५ – ४० महाराष्ट्रीय कुटुंब कार्यक्रमात सामील झाली. 

५/ऑक्टोबर/२०१७

कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात १०२ जणांनी सहभाग नोंदवला. 

११/ऑक्टोबर/२०१७

एकत्र आलेल्या या सुहृदांचा हा समूह असाच ठेवावा व भविष्यातही कार्यक्रम राबवावेत असे बहुमताने ठरले.सर्वानुमते समूहाचे स्नेहबंधअसे नामकरण करण्यात आले.

२९/ऑक्टोबर/२०१७

पुढच्या दिशा ठरवण्यासाठीस्नेहबंधची उद्दीष्ट्ये संकलित करून प्रसिद्ध करण्यात आली. 

११/नोव्हेंबर/२०१७

फेसबुक वर स्नेहबंध चा समूह सुरु करण्यात आला.

१९/डिसेंबर/२०१७ ते ३१/डिसेंबर /२०१७

स्नेहबंधच्या उद्दिष्टांना साजेसे ब्रीदवाक्य ठरवण्यासाठी स्पर्धा व फेसबुक समूहाद्वारे मतदान घेण्यात आले

५/जानेवारी/२०१८

स्नेहबंध: एक नातं आपुलकीचं अस्तित्वात आले.

स्नेहबंध परिवारची सोहारमधल्याभारतीय समुदायात महाराष्ट्राशी आपुलकी असणार्‍यांचा समुहअशीओळख निर्माण व्हावी या हेतुने महाराष्ट्रीय मंडळी (People of Maharashtra) असे संबोधन वापरण्यात येते.

स्नेहबंधची कुणाशीही स्पर्धा नाही. त्यामुळे कामकाज स्पर्धात्मक नव्हेतर गुणात्मक असते.

Contact Usआमच्याशी संपर्क साधा

Email Address:

snehbandhsohar@gmail.com